
गुन्हेगारांसाठी पश्चिम रेल्वेतर्फे प्रमुख स्थानकांवर विशेष पथके
मुंबई, ता. २१ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेचे सुरक्षा दल कार्यरत आहे. पश्चिम रेल्वे पोलिसांनी ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटीअंतर्गत अवघ्या एका दिवसात चोरीच्या गुन्ह्यात सहभागी पाच चोरट्यांना पकडले. २०२२ मध्ये मुंबई विभागाच्या रेल्वे संरक्षण दलाने आतापर्यंत २२६ चोर आणि १६ दरोड्यांतील आरोपींना अटक केली आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच त्यांची माहिती गोळा करण्यासाठी मुंबई विभागातील सर्व प्रमुख स्थानकांवर विशेष गुन्हे प्रतिबंध आणि तपास पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्या आधारे सीसीटीव्ही फुटेजद्वारे माहिती गोळा केली जाते. स्थानक आणि आसपासच्या ब्लॅक स्पॉट्सचे विश्लेषण केले जाते. नेहमीच्या गुन्हेगारांच्या नोंदी ठेवल्या जातात. गेल्या वर्षी चर्चगेट-विरार उपनगरीय विभागात २७०० हून अधिक नवीन सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. १९ जून २०२२ रोजी एकाच दिवसात चोरीच्या पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या दरोडेखोरांना पकडण्यात आले आहे. सीपीडीएसच्या पथकाने मालाड, विरार आणि सुरत स्थानकांवरून संशयित मोबाईल चोरांना पकडले. नालासोपारा आणि वसई रोड स्थानकांवरून वेगवेगळ्या प्रकरणांत दोन चोरट्यांना पकडण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86501 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..