
लोकलमध्ये प्रवाशांना योगसनाचे धडे
मुंबई, ता. २१ : मुंबईकरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकलमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. मुंबईतील ७५ योग शिक्षकांच्या समूहाने सीएसएमटी ते दादर, दादर ते चर्चगेट आणि चर्चगेट ते बोरिवली स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये प्रात्यक्षिके सादर केली. लोकलमध्ये उभे राहून अथवा जागेवर बसून प्रवाशांनीही मोठ्या उत्साहाने योगासने केली.
सर्वप्रथम हिल स्टेशन समूहाच्या ७५ योग शिक्षकांनी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात योगासनांना सुरुवात केली. त्यांनी दादरपर्यंतच्या सत्रात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसोबत ट्रेनमध्ये योगाभ्यास केला. इतरत्र काही सत्रे पूर्ण करून संघ पुन्हा आणखी एका सत्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला परतला. दादर ते चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या लोकलमध्येही त्यांनी प्रवाशांना योगासने शिकवली. त्यानंतर काही शिक्षकांनी मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान लोकल प्रवाशांना योगासनाचे महत्त्व पटून दिले. ७५ योग शिक्षकांच्या समूहाने छोट्या छोट्या तुकड्या करून प्रवाशांना आणि रेल्वेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांना योगसने शिकवली.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले, की ७५ योग शिक्षकांच्या समूहाने प्रवाशांना लोकलमध्ये प्रवासादरम्यान योगाभ्यास करून त्यांच्या प्रवासाचा वेळ फिटनेससाठी कसा वापरता येईल हे शिकलो.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86507 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..