मंत्री अनिल परब यांची ईडीकडून दिवसभर चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्री अनिल परब यांची ईडीकडून दिवसभर चौकशी
मंत्री अनिल परब यांची ईडीकडून दिवसभर चौकशी

मंत्री अनिल परब यांची ईडीकडून दिवसभर चौकशी

sakal_logo
By

मंत्री अनिल परब यांची ईडीकडून दिवसभर चौकशी

मुंबई, ता. २१: एकीकडे राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विशेषकरून शिवसेना पक्ष संकटात सापडलेला असताना दुसरीकडे शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची मंगळवारी तब्बल १० ते १२ तास ईडीकडून चौकशी सुरू होती. परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात सकाळी ११.२० च्या सुमारास पोहोचले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात येत होती.

याआधी दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी १५ जून रोजी अनिल परब यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते; मात्र पूर्वनियोजित कामकाजाचे कारण देत त्या दिवशी ते हजर झाले नाहीत. त्यामुळे आजही ते चौकशीला उपस्थित राहणार का, याबद्दल प्रश्नचिन्ह होते; मात्र आज ते चौकशीसाठी हजर झाले.

एकाच आठवड्यात दुसरे समन्स
दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांना एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा ईडीचे समन्स आले आहे. यापूर्वी रिसॉर्टच्या बांधकामात कोस्टल रेग्युलेशन झोनच्या तरतुदींचे कथित उल्लंघन आणि मनीलॉण्डरिंग प्रकरणात अनिल परब यांची चौकशी करण्यात आली होती. २६ मे रोजी ईडी अधिकाऱ्यांनी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या सात ठिकाणी छापे घातले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86510 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top