विरारच्या विवा महाविद्यालयात योगसाधना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरारच्या विवा महाविद्यालयात योगसाधना
विरारच्या विवा महाविद्यालयात योगसाधना

विरारच्या विवा महाविद्यालयात योगसाधना

sakal_logo
By

विरार, ता. २२ (बातमीदार) ः विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित विवा महाविद्यालयामध्ये मंगळवारी (ता. २१) राष्ट्रीय सेवा योजनातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. यानिमित्त विविध योगासने करण्यात आली.

वर्षातला सर्वांत मोठा दिवस २१ जून हा ओळखला जातो. २०१५ पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. केवळ एक दिवस योग दिन साजरा करण्यापेक्षा निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी या योग शिबिरामध्ये प्रा. पद्मजा अभ्यंकर यांनी १६ जूनपासून २१ जूनपर्यंत विविध योगासनांची माहिती देऊन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना योगासनांचे फायदे काय आहेत याचे मार्गदर्शन केले. या योग शिबिरासाठी विवा महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समिती, प्राचार्य डॉ. वीरेंद्र अडीगल, उपप्राचार्या प्रा. प्राजक्ता परांजपे आणि डॉ. दीपा वर्मा यांचे विशेष सहकार्य लाभले. योग शिबिराचे संपूर्ण नियोजन प्रा. दीपा दळवी, प्रा. कोमल लक्ष्मण पाटील आणि प्रा. जॉन्सन वर्की यांनी केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86523 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top