सायवन मेढे पूल रहदारीसाठी खुला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायवन मेढे पूल रहदारीसाठी खुला
सायवन मेढे पूल रहदारीसाठी खुला

सायवन मेढे पूल रहदारीसाठी खुला

sakal_logo
By

वसई, ता. २२ (बातमीदार) ः वसई पूर्वेकडील सायवन मेढे पूल गेली दोन वर्षे रखडला होता. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्याअगोदर या पुलाची उभारणी केली आहे. तसेच पुलाची चाचणी करून तो रहदारीसाठी खुला केला असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

वसई पूर्वेकडील सायवन, मेढे, वडघर, कळभोन, आंबोडे, भिनार व आदिवासी पाड्यातील नागरिकांना पुलाअभावी अडचण निर्माण झाली होती. तानसा नदीवरील मेढे येथे आगोदर असलेला पुल जीर्णावस्थेत होता. पुलाचे बांधकाम ढासळले होते. तसेच उंची कमी असल्याने तसेच तानसा नदी दुधडी भरून वाहू लागल्यास पूल पाण्याखाली येत होता. त्याचा फटका येथील गावांना बसत होता. ग्रामस्थांनी सातत्याने मागणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे काम दोन वर्षांपूर्वी हाती घेतले. नव्या पुलासाठी तीन कोटी खर्च करण्यात आला आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे तानसा नदीच्या आजूबाजूच्या गावातील ३० ते ३५ हजार लोकवस्तीला दिलासा मिळाला आहे.
---
तानसा नदीजवळील नागरिकांना ये-जा करण्यासाठी सोईचे व्हावे म्हणून मेढे या ठिकाणी नव्या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले होते. ते पूर्ण झाले आहे.
- प्रशांत ठाकरे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
---------
पावसाळ्यात येथील गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे पुलाची उभारणी लवकरात लवकर करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने केली. पूल नागरिकांसाठी खुला झाल्याने दिलासा मिळाला आहे.
- राम पाटील, अध्यक्ष, वसई तालुका ग्रामीण काँग्रेस

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86545 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top