राज ठाकरे यांच्या आरोग्यासाठी होमहवन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरे यांच्या आरोग्यासाठी होमहवन
राज ठाकरे यांच्या आरोग्यासाठी होमहवन

राज ठाकरे यांच्या आरोग्यासाठी होमहवन

sakal_logo
By

वसई, ता. २२ (बातमीदार) ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नाही. त्यामुळे नालासोपारा येथील मनसैनिकांनी हनुमान मंदिरात होमहवन, करत त्यांच्या आरोग्यासाठी देवाला साकडे घातले.

नालासोपारा पूर्वेकडील नगीनदासपाडा येथील हनुमान मंदिरात उपशाखाध्यक्ष अजय गुप्ता यांनी होम, हनुमान चालिसा, महाआरतीचे आयोजन केले होते. या वेळी नालासोपारा शहर सचिव राज नागरे, विरार महिला शहर सचिव अर्चना गोळे, निकिता जोशी, संतोष रेवाळे, रोजगार व स्वयंरोजगारचे पालघर जिल्हा संघटक जय जैतापकर, सत्येंद्र पांडे, मनोहर घरटकर, पवन सावंत उपस्थित होते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची प्रकृती उत्तम राहो, अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86547 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top