पोलिस कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेची विशेष बससेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेची विशेष बससेवा
पोलिस कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेची विशेष बससेवा

पोलिस कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेची विशेष बससेवा

sakal_logo
By

भाईंदर, ता. २२ (बातमीदार) : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात काम करणाऱ्‍या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने ठाणे ते भाईंदर अशी विशेष बससेवा सुरू केली आहे. या बससेवेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्‍यांना वेळेवर कामावर हजर राहणे शक्य होणार आहे.

पोलिस आयुक्तालयांतर्गत मिरा-भाईंदर कार्यक्षेत्रात काम करणारे अनेक अधिकारी व कर्मचारी दररोज ठाणे ते भाईंदर असा प्रवास करत असतात. अनेकदा वेळेवर बस किंवा इतर साधने उपलब्ध न झाल्याने त्यांना कामावर पोहोचण्यासाठी उशीर होतो. यासाठी आयुक्त दिलीप ढोले यांच्या सूचनेनुसार महापालिकेने एक विशेष बस सुरू केली आहे. ही बस ठाणे रेल्वे स्थानक पूर्व येथून सकाळी ८.४५ वाजता भाईंदरसाठी सुटणार आहे. ही बस पोलिस आयुक्तालय मुख्यालय, मिरा रोड रेल्वे स्थानकमार्गे भाईंदर पश्चिम येथील रेल्वे स्थानकापर्यंत येणार आहे. सायंकाळी भाईंदर रेल्वे स्थानकातून ही बस ६.३० वाजता सोडण्यात येणार आहे. या बसचा शुभारंभ नुकताच पोलिस आयुक्त सदानंद दाते यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, परिवहन उपव्यवस्थापक स्वप्नील सावंत, प्रशासकीय अधिकारी दिनेश कानगुडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86548 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top