बदलापूरमध्ये शिवसेना ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलापूरमध्ये शिवसेना ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत
बदलापूरमध्ये शिवसेना ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत

बदलापूरमध्ये शिवसेना ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत

sakal_logo
By

बदलापूर, ता. २२ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर बदलापूर शहरात सध्या शिवसेना वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे चित्र दिसत आहे. शिंदे यांच्यामुळे शहरात शिवसेनेची ताकद वाढली, मात्र त्यांच्या भूमिकेनंतर पुढे परिस्थिती काय असेल हे पाहणे सध्या महत्त्वाचे असल्‍याचे वामन म्हात्रे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यात विशेषकरून अंबरनाथ, बदलापूर शहरात विशेष लक्ष होते. या शहरांचा विकास व्हावा यासाठी त्यांनी अनेकदा सरकारकडून निधी मंजूर करून दिला आहे. बदलापूर शहरातील कोरोनाच्या परिस्थितीत शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना एकनाथ शिंदे यांचे नेहमीच सहकार्य मिळाले आहे. त्यामुळे बदलापूर शहरात सेनेच्या गोटात अनेक जण शिंदे यांच्या कार्यप्रणालीचे चाहते आहेत. मात्र असे असताना, कालपासून घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे बदलापूर शहरातील राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे.

शहरातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता, शिवसेना नेहमीच उजवी ठरली आहे. त्यात आता दोन वर्षे कोरोनाने रखडलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका येऊ घातल्या आहेत. अशा स्थितीत शहरातील पक्षाची स्थिती मजबूत ठेवण्याचे काम आमचे असून, आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोतच, मात्र ही परिस्थिती लवकर निवळून सारे काही आलबेल व्हावे, अशी इच्छादेखील वामन म्हात्रे यांनी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86553 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top