वसईत चिवणी माशांना खवय्यांची पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत चिवणी माशांना खवय्यांची पसंती
वसईत चिवणी माशांना खवय्यांची पसंती

वसईत चिवणी माशांना खवय्यांची पसंती

sakal_logo
By

विरार, ता. २२ (बातमीदार) ः वसईत समुद्राची मासळी सागरी मासेमारी बंदीमुळे येणे बंद झाले आहे. त्यामुळे आता खाडीच्या मासळीला मागणी वाढत चालली आहे. यात चवीला व खायला सर्वांत रुचकर असलेल्या चिवणी माशांना भलतीच मागणी वाढली आहे. दरवर्षी समुद्री मासेमारी बंदीमुळे वसईत चिवणी माशांना मागणी वाढत आहे. या मासळीमुळे स्थानिकांना चांगला रोजगार मिळत असून खवय्यांचीदेखील चिवणी मासे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेकडे पावले वळू लागली आहेत.

वसई पश्चिम किनारपट्टीमुळे खवय्यांना आठ महिने चांगली ताजी व रुचकर मासळी खायला मिळते; मात्र मत्स्यप्रजननाच्या काळात समुद्री मासेमारीवर बंदी येते. त्यामुळे पुढील तीन महिने वसईकरांना नदी-तलाव व खाडीच्या मासळीवर अवलंबून राहावे लागते. नदी-तलाव व खाडीतून मिळणाऱ्‍या गावठी मासळीला पावसाळ्यात चांगली मागणी असते. यात खाडीत मिळणाऱ्‍या चिवणी माशांना चांगला भाव मिळतो. चिवणी माशांचे वाटे १०० पासून ते ५०० रुपयांपर्यंत विक्रीसाठी ठेवले जातात. चांगला भाव मिळत असल्याने स्थानिक मासेमारांनादेखील चांगला रोजगार प्राप्त होत आहे. सध्या बाजारपेठेत चिवणी माशांना चांगली मागणी असनू दूरवरून ग्राहक पडेल त्या किमतीला चिवणी खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे वसईच्या ग्रामीण भागातील जूचंद्र येथे सध्या चिवणी माशांचे मार्केट गजबजले आहे. बाजारपेठेत ही मासळी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने ग्राहकांची ही मासळी खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. सध्या कमी प्रमाणात पाऊस असल्याने चिवणी मासे कमी येत असून पाऊस जास्त पडताच मोठ्या प्रमाणावर चिवणी मासे बाजारात विक्रीसाठी येतात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86572 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top