जिमी पार्क इमारत पाडण्याचे महापालिकेचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिमी पार्क इमारत पाडण्याचे महापालिकेचे आदेश
जिमी पार्क इमारत पाडण्याचे महापालिकेचे आदेश

जिमी पार्क इमारत पाडण्याचे महापालिकेचे आदेश

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता.२२ ः नेरुळ येथील जिमी पार्क सोसायटीतील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेला सदनिकेतील नूतनीकरण कारणीभूत ठरले आहे. महापालिकेने केलेल्या बांधकाम परीक्षणात (स्ट्रक्चरल ऑडीट) ही गंभीर बाब निष्पन्न झाली आहे. तसेच ही इमारत धोकादायक असल्यामुळे महापालिकेने ही इमारत पाडण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.
६ जून २०२२ ला शनिवारी दुपारच्या सुमारास जिमी पार्क सोसायटीतील ‘ए’ विंग इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील पाच स्लॅब एकामागोमाग खाली कोसळले. सहाव्या मजल्यावरील एका सदनिकेच्या हॉलमधील स्लॅब खाली कोसळत तळमजल्यावर आला. या दुर्घटनेत एकूण ९ रहिवासी जखमी झाले. तर व्यंकटेश नाडर नावाच्या एका तरुणाला जीव गमवावा लागला. कोसळलेले स्लॅब पाहून सहाव्या मजल्यावरील सदनिकेतील नूतनीकरण कारणीभूत असल्याचे प्राथमिक अंदाज महापालिकेतर्फे वर्तविण्यात आला होता. परंतु ठोस कारण शोधण्यासाठी महापालिकेतर्फे इमारतीचे बांधकाम परिक्षण करण्यात आले. या परीक्षणासाठी महापालिकेतर्फे घेतलेले विविध नमुने तीन स्वतंत्र प्रयोगशाळेत तपासण्यात आले. तसेच आयआयटी बॉम्बे या संस्थेच्या तज्ज्ञांचेही मदत घेण्यात आली होती. महापालिकेने केलेल्या बांधकाम परीक्षणात तुटलेल्या स्लॅबचे काँक्रिट खराब झाल्याचे निष्पन्न झाले आहे. इमारतीचे बांधकाम खराब आणि जीर्ण झाल्याचे समोर आले आहे. सदनिकेच्या नूतनीकरणाच्या कामात जुने स्टील काढून नवीन स्टील टाकताना काम करणारे कामगार अकुशल असल्यामुळे स्लॅब खिळखिळे होऊन दुर्घटना घडल्याचे अहवालात पुढे आल्याची माहिती शहर अभियंते संजय देसाई यांनी दिली.
----------------------------------------------
इमारत पाडावी लागणार
जिमी पार्क इमारत दुर्घटनेप्रकरणी महापालिकेच्या बांधकाम परीक्षणात सदरची इमारत धोकादायक स्थितीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सद्या या इमारतीमध्ये रहिवासी वास्तव्याला नाहीत. मात्र धोकादायक अवस्थेत असल्यामुळे ही इमारत पाडण्याचे आदेश नवी मुंबई महापालिकेने सोसायटीला दिले आहे. तसेच सदर प्रकरणी जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया लवकरच केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86589 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top