जेडी भरडा हायस्कूलमध्ये योगदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेडी भरडा हायस्कूलमध्ये योगदिन
जेडी भरडा हायस्कूलमध्ये योगदिन

जेडी भरडा हायस्कूलमध्ये योगदिन

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. २२ (बातमीदार) ः ग्रांट रोड येथील जे. डी. भरडा हायस्कूलमध्ये सोमवारी (ता. २०) आंतरराष्ट्रीय योगदिन योगासने करीत साजरा केला. शाळेतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या मोकळ्या सभागृहात योगासने केली.
जे. डी. भरडा हायस्कूलच्या व्यवस्थापकीय विश्वस्त तेहसीन खान यांनी योगादिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले, की नियमित योगा केल्याने मन प्रसन्न राहते. चेहरा, कांती तेजस्वी बनते, शरीरात लवचिकता निर्माण होते. श्वसनक्रिया सुधारते. मांसपेशींची ताकद वाढते. हाडांना बळकटी येते. मणक्याचे हाड मजबूत करते. शरीरातील रक्तप्रवाह संतुलित ठेवते. शारीरिक, मानसिक आणि आत्मिक शक्ती वाढवते. तणावमुक्त आरोग्यमय जीवन प्रदान करते. मनाची एकाग्रता वाढवते. उत्तम झोप, अन्न पचन उत्तम ठेवते. आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढवते. त्यामुळे सकाळी किंवा सायंकाळी तासभर वेळ काढून नियमित योगा करावा.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86612 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top