नव्या रंग-रूपातील डेक्कन क्वीन सेवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या रंग-रूपातील डेक्कन क्वीन सेवेत
नव्या रंग-रूपातील डेक्कन क्वीन सेवेत

नव्या रंग-रूपातील डेक्कन क्वीन सेवेत

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आजपासून नव्या रंगात आणि एलएचबी डब्यासह प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. सीएसएमटी स्थानकातूनही सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी नवीकोरी पहिली डेक्कन क्वीन पुण्याकडे रवाना झाली. ऐतिहासिक क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी प्रवाशांनीही रेल्वेस्थानकांवर मोठी गर्दी केली होती. मुंबई ते पुण्यादरम्यान दररोज डेक्कन क्वीनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक आरामदायी आणि सुरक्षित झाला आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे कंपनीतर्फे पहिली आरामदायी ट्रेन १ जून १९३० रोजी मुंबई ते पुणेदरम्यान सुरू केली होती. तेव्हापासून तिला ‘दख्खनची राणी’ असे नाव देण्यात आले होते. ९२ वर्षांच्या डेक्कन क्वीनच्या प्रवासात अनेक बदल झाले. या गाडीला गेल्या वर्षी १५ ऑगस्टपासून विस्टाडोम कोच जोडण्यात आला. मात्र, एलएचबी डब्यांसह डेक्कन क्वीनची धाव बहुप्रतिक्षित होती. जी आजपासून सुरू झाली. नव्या एक्स्प्रेसला अत्याधुनिक लिंक-हॉफमन-बुश (एलएचबी) डबे जोडण्यात आले आहेत. अंतर्गत सजावटीवरही भर दिला गेला आहे. नव्या डायनिंग कारच्या खिडक्या मोठ्या स्वरूपात काचेच्या असून बरीच मोकळी जागा करण्यात आली आहे.

अशी असेल रचना
नव्या डेक्कन क्वीनमध्ये चार एसी चेअर कार, आठ द्वितीय श्रेणी चेअर कार, एक विस्टाडोम कोच, एक एसी डायनिंग कार, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार राहणार आहे.

डेक्कन क्वीनमध्ये असे झाले बदल
- जून १९३० मध्ये सात डब्यांची
- १९४९ मध्ये प्रथम श्रेणी रद्द करण्यात आली. द्वितीय श्रेणीची प्रथम श्रेणी म्हणून पुनर्रचना करण्यात आली.
- एप्रिल १९७४ पासून एक्स्प्रेस १२ डब्यांची करण्यात आली.
- १९९५ मध्ये १७ डब्यांची करण्यात आली.
- १५ आगस्ट २०२१ रोजी डेक्कन क्वीन विस्टाडोम कोच जोडला.
- २२ जून २०२२ एलएचबी डब्यासह नवीन रंग.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86613 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top