
कर वसुलीसाठी वाहनांवर बडगा
वसई, ता. २३ (बातमीदार) ः उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाने कर थकबाकी असणारी वाहने जप्त केली होती. त्या १५० वाहनांपैकी ५४ वाहनांचा पहिल्या टप्प्यात लिलाव केला जाणार आहे.
मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम २०७ नुसार व मुंबई मोटार वाहन कर कायदा १२ (ब) नुसार थकबाकी कर वसुलीसाठी व मोटार वाहन कायद्याप्रमाणे उपप्रादेशिक परिवहन विभागाने १५० वाहनांवर कारवाई केली आहे. या वाहनधारकांनी कर भरला नाही, त्यामुळे त्यांची वाहने जप्त करून उपप्रादेशिक विभागात ठेवण्यात आली आहेत.
कर न भरल्याने शासनाच्या महसुली उत्पन्नावर परिणाम होतो, म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी दशरथ वाघुले यांनी थेट वायुपथक नेमले होते. त्यानुसार वाहनांचा शोध घेण्यात आला होता. या कारवाईत जमा झालेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ५४ वाहनांचा लिलाव २७ जून रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत विरार पूर्व चंदनसार उपप्रादेशिक कार्यालय येथे होणार आहे. यात ३७ रिक्षा, तीन बसेस व अन्य वाहनांचा समावेश आहे.
वाहनांची कर वसुली थकीत राहिल्याने नोटीस प्रक्रिया पूर्ण करण्यात आली; परंतु कर न भरल्याने वाहनाचा लिलाव केला जाणार आहे.
- दशरथ वाघुले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन विभाग
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86643 Txt Palghar Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..