टिटवाळा रेल्वे उड्डाण पुलाचे काम बंद पडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टिटवाळा रेल्वे उड्डाण पुलाचे काम बंद पडणार
टिटवाळा रेल्वे उड्डाण पुलाचे काम बंद पडणार

टिटवाळा रेल्वे उड्डाण पुलाचे काम बंद पडणार

sakal_logo
By

कल्याण, ता. २३ (बातमीदार) : मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे उड्डाण
पुलाचे काम प्रगतिपथावर असताना रेल्वेकडून आवश्यक निधी उपलब्ध न झाल्याने महत्त्‍वपूर्ण प्रकल्प बंद पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मध्य रेल्वे आपली सेवा वेगवान करण्यासाठी रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करत तेथे उड्डाण पूल बनविण्याचे नियोजन करत आहे. केडीएमसी आणि रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवली-ठाकुर्ली दरम्यान, त्यानंतर आंबिवली आणि शहाडदरम्यान वडवली फाटकानंतर, टिटवाळाजवळ रेल्वेस्थानकाच्या मुंबईच्या दिशेने फाटक क्रमांक ५१ जवळ उड्डाण पूल बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. हा उड्डाण पूल बनल्यास शहापूर आणि नाशिककडे जाणारा पर्यायी मार्ग होणार असल्याने केडीएमसी आणि रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या पुलासाठी ५०-५० टक्के खर्च करण्‍यात येणार आहे.
या उड्डाण पुलाला रेल्वेने १७ जानेवारी २०२० रोजी मान्यता दिल्याने कामाला सुरुवात झाली असून, रेल्वे रुळावरील उड्डाण पुलाचे काम रेल्वे, तर पोहच रस्त्याचे काम केडीएमसी करणार असून ते काम ३० टक्के पूर्ण झाले आहे.
पोहच रस्त्याच्‍या कामासाठी सुमारे २८.९१ कोटी खर्च अपेक्षित असून हे काम पूर्ण करण्यास १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. जून-जुलै २०२३ मध्ये हा पूल वाहतुकीला खुला झाल्यास कल्याण ते कसारा रेल्वे वाहतूक जलदगतीने, तर कल्याण ते शहापूर आणि नाशिककडे जाणारी रस्ते वाहतूक विनाअडथळे होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
------------------------------------
रेल्‍वेकडून प्रतिसाद नाही
पुलासाठीचा ५०- ५० टक्के खर्च केडीएमसी आणि रेल्वे करणार असून पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना, या प्रकल्पाला पालिकेने प्राधान्य देत उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात केली. मात्र, काम सुरू झाले तरी रेल्वेने निधी दिला नसून याबाबत पत्रव्यवहार करूनही रेल्वेकडून प्रतिसाद न मिळाल्याने काम बंद पडण्याची भीती पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून, याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकलेला नाही.

असा आहे उड्डाण पूल...
रेल्वे रुळावरील पूल
स्पॅन : ५१.०० मीटर दुपदरी
रुंदी : १०.२० मीटर
फूटपाथ : १.५० मीटर
------------------------------
पोहच रस्ते
पूर्वेला पोहच रस्ता ९० मीटर लांबीचा पूल, ८.५० मीटर रुंदीचा दुपदरी वाहतूक होणार असून, ७० मीटर लांबीचा, १७ मीटर रुंदीचा पोहच रस्‍ता चौपदरी वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे.

मांडा टिटवाळाकडे जाणारा पश्चिम बाजूकडील पोहच रस्ता २५६ मीटर लांबीचा पूल, रुंदी ८.५० मीटर दुपदरी वाहतूक करण्यास उपलब्ध जागा असून १५५ मीटरमधील लांबीचा आणि रुंदी ८.५० मीटर दुपदरी वाहतुकीसाठी उपलब्ध जागा असणार आहे.

आंबिवलीकडे जाणारा पोहच रस्ता लांबी १४४ मीटर पूल, रुंदी ५.५० मीटर एकपदरी वाहतूक करता येणार असून १३७ मीटरमधील लांबीचा, रुंदी ५.५० मीटर एक पदरी वाहतुकीसाठी जागा उपलब्ध आहे.


फोटो

उड्डाण पुलाचे काम सुरू असलेले ...ड्रोनच्या मदतीने घेतलेले फोटो

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86649 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top