घुसमटीला वाचा फोडणे म्हणजे बंड नव्हे; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घुसमटीला वाचा फोडणे म्हणजे बंड नव्हे;
घुसमटीला वाचा फोडणे म्हणजे बंड नव्हे;

घुसमटीला वाचा फोडणे म्हणजे बंड नव्हे;

sakal_logo
By

बदलापूर, ता. २३ (बातमीदार) : महाविकास आघाडीत राहून जर आपलीच कामे होत नसतील तर ती घुसमट व्यक्त करणे म्हणजे बंड नव्हे असे म्हणत, मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. घरातच जर मतभेद असतील, त्रास होत असेल तर आवाज उठवणे आणि स्वतःच्या समस्या मांडणे काही गैर नसल्‍याचे कथोरे यांनी स्पष्ट केले.
सध्या राज्यात जी राजकीय स्थित्यंतरे घडत आहेत, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पारदर्शक असला पाहिजे, असे म्हणत राज्याच्या हिताच्या दृष्टीने शिंदे यांचे पाऊल योग्य असून, ते पक्षाला शिस्त लावण्याचे देखील काम करत आहेत. त्यांनी त्यांचे परखडपणे मांडलेले विचार योग्य असल्याचे कथोरे यांनी सांगितले.
एकीकडे राज्यात शिंदे समर्थक आमदारांना फूस लावण्याचे काम भाजपने केल्याचे शिवसेनेतून बोलले जात असताना, यावर प्रतिक्रिया देत कथोरे यांनी सांगितले, की भाजपचा यात कोणताही हस्तक्षेप नाही. ती शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस आहे, जी आता बाहेर पडत आहे. भाजपला सत्तेत स्वारस्य नाही तर राज्याचा कारभार नीट चालावा ही भूमिका भाजपची आहे. त्यामुळे भाजपने कोणताही सत्ता स्थापनेचा दावा केला नाही. जर पुढे शिंदे समर्थक आमदारांचा आकडा सत्ता स्थापनेसाठी योग्य ठरला व भाजपला सत्तेसाठी विचारणा झाली तर भाजप नक्‍कीच विचार करेल, अशीही भूमिका कथोरे यांनी स्पष्ट केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86650 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top