
मोबाईलवरून संपर्क केल्यास तातडीची मदत मिळणार
पनवेल, ता. २३ (बातमीदार) : पनवेल महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात आपत्ती काळात अत्यावश्यक वस्तू, व्यवस्थापन कक्षाचा आढावा आपत्ती व्यवस्थापनाच्या मुख्यालयात नुकताच घेण्यात आला. नागरिकांना आपत्कालीन वेळेत मदतीसाठी महापालिकेकडून मोबाईल क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
पनवेल महापालिकेमार्फत कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी पावसाळ्यादरम्यान येणाऱ्या आपत्ती नियंत्रणासाठी २४ तास सुरू असलेले नियंत्रण कक्ष सज्ज आहे. पालिका मुख्यालयातील अग्निशमन विभागाच्या तळमजल्यावर हे केंद्र उभारण्यात आले आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या काळात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास नागरिकांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले. आपत्ती काळात मुख्यालय आणि प्रभाग समितीच्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांमध्ये संवाद साधून काम करावे, अशा सूचना प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या बैठकीला उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, सहायक आयुक्त डॉ. वैभव विधाते, प्रभाग अधिकारी, मुख्यालयातील अधिकारी आदी उपस्थित होते.
आपत्ती काळात संपर्क
प्रभाग समिती प्रभाग अधिकारी संपर्क क्रमांक
१. ‘अ’ खारघर जितेंद्र मढवी ९८१९९९८७८८
२. ‘ब’ कळंबोली सदाशिव कवठे ९८१९६३३१७४
३. प्रभाग ‘क’ अरविंद पाटील ९३२२३५१८९७
४. प्रभाग ‘ड’ अमर पाटील ८३६९६७३१६९
क प्रभागामधील स्वच्छता निरीक्षक ऋषिकेश गायकवाड (प्रभाग क्र. ११, १२) यांचा मोबाईल क्रमांक ९६१९३१४४७५ असून, स्वच्छता निरीक्षक अतुल वास्कर (प्रभाग १२) यांचा ८४५२९६१०९४; तर स्वच्छता निरीक्षक जयेश कांबळे (प्रभाग क्र. १४) यांना ८१६९२५४१७४ या ठिकाणी संपर्क करता येईल.
मुख्यालयातील अग्निशमन विभाग
संपर्क क्रमांक ०२२-२७४५८०४०/४१/४२
दूरध्वनी ०२२-२७४६९५००
टोल फ्री १८००२२७७०१
व्हॉट्सॲप ९७६९०१२०१२
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86653 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..