
आपत्कालीन तक्रारीसाठी सिडकोचे मदतकेंद्र
बेलापूर, ता. २३ (बातमीदार) : पावसाळ्यात नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. सिडकोने याची दखल घेत आपत्कालीन मदत केंद्र सुरू आहेत. पावसाळ्याशी संबंधित तक्रारीसाठी एक जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत थेट संपर्क अथवा व्हॉट्सअपवर संदेश पाठवता येईल. पुढील चार महिने दररोज २४ तास ही सेवा कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले.
नवी मुंबईची सुनियोजित शहर अशी ओळख आहे, मात्र नैसर्गिक आपत्तीवेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत नागरिकांच्या तक्रारी पोहोचण्यास विलंब होतो. पावसाळ्यात सखल भागात पाणी तुंबणे, झाडे उन्मळून पडणे, अन्य कोणतीही समस्या उद्भवल्यास नागरिकांना सिडकोला संपर्क साधण्यास मदत व्हावी, यासाठी आपत्कालीन मदतकेंद्र सुरू करण्यात आले. यासाठी १८००२२६७९१ हा मदतीसाठी क्रमांक असून ८८७९४५०४५० या व्हॉट्सअप क्रमांकावर फोटो, व्हिडिओ पाठवता येईल. सिडकोने सामाजिक सेवा संस्थेतील स्वयंसेवकांनाही मदतीसाठी प्रशिक्षण दिले आहे. नागरिकांनी तक्रार नोंदविल्यावर स्थानिक विभागातील अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
खाडी पट्ट्यातील अपघातप्रवण क्षेत्र, तसेच धोकादायक इमारतींच्या ठिकाणी फलक लावण्यात येणार आहेत. तसेच काही ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येईल. पाणी तुंबू नये, यासाठी आवश्यक यंत्रसामग्री २४ तास उपलब्ध राहील.
- प्रिया रतांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको
आपत्कालीन मदतकेंद्र- १८००२२६७९१
व्हॉट्सअप क्रमांक- ८८७९४५०४५०
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86658 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..