आम्ही दादा समर्थक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आम्ही दादा समर्थक
आम्ही दादा समर्थक

आम्ही दादा समर्थक

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २३ (बातमीदार) ः राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याबाबत येथील अनेक शिवसैनिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे, मात्र काही कार्यकर्त्यांकडून शिंदे यांना समर्थन देणारे बॅनर झळकवले गेले आहेत.
ठाण्यात बुधवारी अशा प्रकारचे बॅनर लागल्यावर आज गुरुवारी घाटकोपरमधील असल्फा येथे एकनाथ शिंदे यांना समर्थन देणारे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो हटवण्यात आला असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले आहेत.
बॅनरवर समर्थकांनी ‘आम्ही दादा समर्थक, लोकांचा नाथ एकनाथ’ असे लिहिले असून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढे नेणारे एकनाथ शिंदे असा उल्लेख करण्यात आला आहे. जावळी महाबळेश्वर युवा प्रतिष्ठान आणि श्री रामेश्वर नवतरुण विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे समर्थन दर्शविणारे बॅनर असल्फा येथे लावले आहेत.
...

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86674 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top