
पालिकेकडून उद्यान, मैदानात कूपनलिका
खारघर, ता. २३ (बातमीदार) : खारघर परिसरातील लोकसंख्या वाढत असून त्या तुलनेत सिडकोकडून पाणीपुरवठा कमी होत आहे. नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याने पाण्याचे इतर स्रोत शोधणे गरजेचे आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या उद्यानात कूपनलिका बांधण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेविका हर्षदा उपाध्याय राऊळ यांनी पालिकेकडे केली होती. या मागणीची दखल घेण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून खारघरवासीयांना सिडकोकडून पाण्याचा अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याच पाण्यामधून झाडांना पाणी देण्यात येते. त्यामुळे पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी आणि उद्यान मैदानात बोअरवेल उभारल्यास पाणी बचत होईल, तसेच झाडांना पाणी देता येईल, हे उद्देश समोर ठेवून पालिकेने खारघर सेक्टर चार, सहा, सात आणि १२ अशा चार उद्यान आणि मैदानात एकूण पाच बोअरचे काम हाती घेण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86682 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..