
विक्रमगडमध्ये शिवसेनेच्या गोटात शांतता
विक्रमगड, ता. २३ (बातमीदार) ः राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेना समर्थक यांच्यात दुही निर्माण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विक्रमगड तालुक्यात शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. काही शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावून पाठिंबा दर्शवला आहे. या बॅनर्समधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे फोटो गायब आहेत. हे बॅनर्स सध्या विक्रमगडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे विक्रमगड शिवसेनेत फूट पडते की काय, असे चित्र असताना शिवसेनेच्या गोटात मात्र शांतता पसरली आहे. याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख सागर आळशी यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देणे टाळले; तर एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावणारे शिवसैनिक निक्की नाईक यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा दूरध्वनी बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86706 Txt Palghar Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..