गटारावर लागली लोखंडी जाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गटारावर लागली लोखंडी जाळी
गटारावर लागली लोखंडी जाळी

गटारावर लागली लोखंडी जाळी

sakal_logo
By

वडाळा, ता. २३ (बातमीदार) ः रफी अहमद किडवाई मार्ग येथील एसआयडब्ल्यूएस शाळेच्या पदपथाच्या रस्त्यालगत असलेल्या मुख्य गटार लाईनवरील गटार चार फूट खोल आहे. गेल्या एक महिन्यापासून झाकण नसल्याने या उघड्या गटारात पडून एखाद्यास इजा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती, याची दखल घेऊन बुधवार २२ जून रोजी ‘सकाळ’ वृत्तपत्रात झाकणाविना गटार; अपघाताचा संभव या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले. त्‍याची दखल घेऊन पालिकेच्या फ उत्तर विभागाने या उघड्या गटारावर लोखंडी जाळीचे झाकण लावून बंद केले आहे. यामुळे पादचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
या मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. परिणामी, पावसाच्या पाण्यात या गटाराचा अंदाज न आल्याने एखादा पादचारी अथवा शाळकरी विद्यार्थी गटारात पडून मृत्युमुखी पडण्याची भीती पादचाऱ्यांनी व्यक्त केली होती. तसेच या गटारावर झाकण लावण्यात यावे, अशी मागणीदेखील पादचाऱ्यांकडून करण्यात आली होती; तर समाजसेवक भगवान कदम यांनी फ उत्तर विभागात या समस्येबाबत तक्रार केली होती; मात्र ‘सकाळ’मध्ये या समस्येचे वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेच्या घनकचरा विभागाला जाग आली. यामुळे पावसाळ्यात अपघात होण्याचा धोका टळला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86733 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top