ठाण्यात एक लाख ६२ हजार मतदार वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात एक लाख ६२ हजार मतदार वाढले
ठाण्यात एक लाख ६२ हजार मतदार वाढले

ठाण्यात एक लाख ६२ हजार मतदार वाढले

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ ः ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार गुरुवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतदारांच्या संख्येत एक लाख ६२ हजार ८५ ने वाढ झाली आहे. त्यामुळे मतदार संख्या १३ लाख ९० हजार ६९१ इतकी झाली आहे. यामध्ये महिला मतदारांच्या संख्येत ८४ हजार ८० इतकी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्यात आता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्या अंतिम करण्याच्या सूचना ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्या ठिकाणच्या महापालिकांना देण्यात आल्या आहेत. त्यात आता मतदार यादीच्या प्रक्रियेचा कार्यक्रमही सुरू झाला आहे. त्यानुसार गुरुवारी (ता. २३) रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत मे २०२२ पर्यंतची मतदारांची संख्या गृहित धरली जाणार आहे. त्यानुसार मे अखेरपर्यंत सुमारे १३ लाख ९० हजार ६९१ मतदारांची नोंद झाल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. यामध्ये सात लाख ४५ हजार ४२४ एवढे पुरुष मतदार आहेत; तर सहा लाख ४५ हजार १६७ इतकी महिला मतदारांची संख्या नोंद झाली असून इतर मतदारांची संख्या १०० वर गेली आहे; तर २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा विचार केला तर त्या वेळेस १२ लाख २८ हजार ६०६ एवढे मतदार होते. त्यात सहा लाख ६७ हजार ५०४ पुरुष; तर पाच लाख ६१ हजार ८७ स्त्री मतदारांची संख्या होती. इतर १५ होती. यामध्ये मागील निवडणुकीपेक्षा यंदा मतदारांच्या संख्येत एक लाख ६२ हजार ८५ ने वाढ झाली आहे; तर महिला मतदारांच्या संख्येत सर्वाधिक ८४ हजार ८० इतकी वाढ झाली असून पुरुष मतदारांच्या संख्येत ७७ हजार ९२० वाढ झाली आहे. तसेच इतर मतदारांच्या संख्येतदेखील ८५ ने वाढ झाली आहे. त्यामुळे या वाढीव मतदारांचा फायदा कोणाला होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
....
एकूण मतदार १३ लाख ९० हजार ६९१
पुरुष मतदार ७ लाख ४५ हजार ४२४
महिला मतदार ६ लाख ४५ हजार १६७
इतर मतदार १५

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86736 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top