
शिक्षक विश्वास पाटील निवृत्त
मनोर, ता. २३ (बातमीदार) ः दहिसरच्या स्वातंत्र्यसैनिक नरोत्तम लक्ष्मण पाटील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक विश्वास पांडुरंग पाटील निवृत्त झाल्याने त्यांच्या सेवापूर्तीचा समारंभ बुधवारी शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या वेळी शिव छत्रपती एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, शाळेचे कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपवेळी निवृत्त शिक्षक विश्वास पाटील यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. १५ डिसेंबर १९८५ ला गिरिजन हायस्कूल शाळेत रुजू होऊन ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नावात बदल झालेल्या स्वातंत्र्यसैनिक नरोत्तम लक्ष्मण पाटील विद्यालयातून निवृत्त होऊन बाहेर पडले. कडक शिस्तीचे असलेले विश्वास पाटील यांचा गणित विषय आवडीचा असल्याने शाळेत गणिताचे अध्यापन करत होते.
कार्यक्रमादरम्यान शिव छत्रपती एज्युकेशन सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष नवनीत पाटील यांचा शाळेचे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86738 Txt Palghar Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..