
गारमेंट कंपनीचा पोटमाळा कोसळला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : चेंबूरच्या गणेश नगर झोपडपट्टीतील औद्योगिक भागात असलेल्या गारमेंट कंपनीच्या पोटमाळ्याचा भाग अचानक कोसळण्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत ११ जण जखमी झाले. त्यापैकी ७ जणांना नजीकच्या इनलॅक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या मुराद अली या २२ वर्षीय तरूणाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
चेंबूरच्या गणेशनगर या ठिकाणी झोपडपट्टीतील इंडस्ट्रीयल भागात काही छोटे छोटे कारखाने, गारमेंट, लघुउद्योग आहे. या ठिकाणी एक मजली गारमेंटमध्ये काही कामगार पोटमाळ्याच्या ठिकाणी तर काहीजण खालील भागात काम करीत असताना दुपारी ३ च्या सुमारास पोटमाळा कोसळल्याची घटना घडली. पोटमाळ्याचा भाग अचानकपणे कोसळल्याने मोठा आवाज झाला. आजूबाजूचे लोक तातडीने घटनास्थळी धावून आले व बचावकार्य सुरू करण्यात आले. दुर्घटनेत १२ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ७ जखमींना नजीकच्या इनलॅक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. धीरज कुमार (१९), रेहान खान (१९), विलास कुलकर्णी (५८), मोहन पाठक (५५), प्रेमनाथ धनावडे (५३) आणि मुरारी झा (२२) या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86764 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..