रथयात्रा जगन्नाथाची तयारी कारागिरांची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रथयात्रा जगन्नाथाची
तयारी कारागिरांची
रथयात्रा जगन्नाथाची तयारी कारागिरांची

रथयात्रा जगन्नाथाची तयारी कारागिरांची

sakal_logo
By

रथयात्रा जगन्नाथाची
तयारी कारागिरांची

आषाढी एकादशीनिमित्त रथ साकारण्यात मुस्लिम कारागीर मग्न

खारघर, ता. २५ (बातमीदार) : भगवान विठ्ठलाचा अवतार असलेल्या जगन्नाथ रथयात्रेची आषाढी एकादशीनिमित्त खारघरमध्ये जय्यत तयारी सुरू झाली आहे. ज्या भक्तांना पंढरपूर तसेच ओडिसातील पुरी या जगन्नाथ धामच्या तीर्थयात्रेला जाणे शक्य होत नाही, अशा भाविकांसाठी जय जगन्नाथ लोकतारण ट्रस्टच्या वतीने खारघरमध्ये रथयात्रेचे आयोजन केले जाते.
रथयात्रेसाठी तब्बल दहा टनाच्या वजनाचा रथ तयार करण्याचे काम सध्या सुरू असून गेल्‍या सोळा वर्षांपासून पनवेल कच्छी मोहल्ला येथे राहणारा महम्मद हनिफ हा रथ तयार करत आहे.
लाकडापासून तयार केलेल्या रथाला पाच घोडे, तसेच रथाच्या चारही बाजूने आकर्षक रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे. २४ फूट उंच व २४ फूट लांबीच्या रथयात्रेत दरवर्षी हजारो भाविक सहभागी होतात.
परंपरेनुसार ओडिसात भगवान जगन्नाथ, बलभद्रा आणि सुभ्रदा यांची भव्य रथयात्रा आषाढी एकादशीनिमित्त काढली जाते. यादिवशी प्रभू जगन्नाथ आपली मावशी गुंडी देवीच्या घरी जाऊन नऊ दिवस राहतात. यात्रेत हजारोंच्या संख्येने भाविक रथ ओढण्यासाठी गर्दी करतात.
यंदा एकादशीला खारघर येथील निफ्ट महाविद्यालय व बालाजी अंगण सोसायटी येथून रथयात्रेला सुरुवात होणार असून खारघर येथील शिवमंदिरातील मावशी गुंडीच्या देवीच्या घरी जाऊन नऊ दिवस राहणार आहे. भगवंतांच्या रासक्रीडेसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच रोज सायंकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

अल्लाहने मला भगवान जगन्नाथासाठी रथ बांधण्यासाठी निवडले, हे माझ्या पालकांचे आणि शुभचिंतकांचे आशीर्वाद आहेत. गेल्‍या १६ वर्षांपासून मी खारघरमध्ये लोकतारण ट्रस्टच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या भगवान जगन्नाथाचा रथयात्रेचा रथ तयार करतो. मी नेहमीच सर्व धर्मांचा आदर करतो. प्रभूंचा हा रथ बनविण्याचे काम महिनाभरापासून सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून रथाच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे.
- महम्‍मद हनिफ, कारागीर


भगवान जगन्नाथ मावशीकडे असताना त्यांना नऊ दिवस विविध प्रकारचा प्रसाद करण्यात येतो, तर दहाव्या दिवशी ५६ प्रकारचे जेवण तयार करण्यात येते. रोज वेगवेगळ्या भाज्यांचा त्‍यात समावेश असतो. एक ते दहा जुलैदरम्यान हा कार्यक्रम खारघर सेक्टर १२ मधील शिवमंदिरात सुरू असेल. यावेळी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
- रत्ना पटनायक, पदाधिकारी, जय जगन्नाथ लोकतारण ट्रस्ट, खारघर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86843 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..