पालिकेच्या शाळा दुरुस्तीत घोटाळा ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेच्या शाळा दुरुस्तीत घोटाळा ?
पालिकेच्या शाळा दुरुस्तीत घोटाळा ?

पालिकेच्या शाळा दुरुस्तीत घोटाळा ?

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २५ (बातमीदार) ः देवनार मनपा शाळेच्या दुरुस्तीत घोटाळा झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मनसेचे शाखा अध्यक्ष सचिन ससाणे यांनी त्यासंदर्भातील पत्र मनपा आयुक्तांना देत चौकशीची मागणी केली आहे. बाहेरून फक्त रंगरंगोटी करून दुरुस्तीचा देखावा केला व कामाचे पैसे लाटल्याचा मनसेचा आरोप आहे.
देवनार मनपा वसाहतीमध्ये टाटा नगरलगत पालिकेची शाळा आहे. या शाळेच्या दुरुस्ती तसेच आधुनिकीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी २० लाख इतका निधी पालिकेने उपलब्ध करून दिला आहे. या कामाची निविदा संबंधित कंत्राटदाराला देताना त्यामध्ये नमूद अटी व नियमांचे पालन केले गेले नाही. त्यामुळे कंत्राटदार व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय मनसेने दिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे. तसेच या कामाची जबाबदारी असलेले अभियंता व सहायक अभियंत्याची चौकशी करण्याची मागणी मनसेने केली आहे.
दरम्‍यान, शाळा पायाभूत सुविधा कक्षाचे सहायक अभियंता शशिकांत मेमाणे यांनी या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. हे काम नियमानुसार सुरू असल्‍याचे सांगत माहिती अधिकारांतर्गत त्यांना या कामाविषयी माहिती हवी असल्यास ती आम्ही उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86866 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..