रंगीबेरंगी कापडी पिशव्यांची चलती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंगीबेरंगी कापडी पिशव्यांची चलती
रंगीबेरंगी कापडी पिशव्यांची चलती

रंगीबेरंगी कापडी पिशव्यांची चलती

sakal_logo
By

कोमल गायकर : सकाळ वृत्तसेवा

घणसोली, ता. २५ : बाजार म्हटला की, खरेदीसाठी हातात पिशवी हवीच. आता पिशवीशिवाय शॉपिंग अधुरीच असल्याचा अनुभव अनेकांना आहे. राज्यात प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला बंदी आल्यापासून खरेदीसाठी जाणाऱ्यांचा कापडी पिशव्यांकडे कल वाढत आहे. या पिशव्यांमध्ये अनेक प्रकारच्या डिझाईन्स उपलब्ध होत असल्याने रंगीबेरंगी पिशव्या घेऊन बाजारात खरेदीसाठी जाणे हल्ली फॅशन होऊ लागली आहे.

खरेदीसाठी बाहेर जायचे म्हटले की, हातात एक पिशवी असतेच. विशेषतः पूर्वी खरेदीसाठी प्लास्टिक पिशवीचे महत्त्व अधिक होते, परंतु सरकारने एकल वापर होणाऱ्या प्लास्टिकवर बंदी आणल्याने दिवसेंदिवस प्लास्टिकच्या पिशव्या बाजारातून कमी होऊ लागल्या आहेत. जुन्या काळात कापडी बॅग्ज हाच पर्याय होता; पण प्लास्टिक आल्यामुळे कापडी पिशव्या नामशेष होऊ लागल्या आणि लोकांना अनफॅशनेबल वाटू लागल्या. पण गेल्या काही काळापासून कापडी पिशव्या वापरण्यास सुरुवात झाली आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांची जागा आता कापडी पिशव्यांनी घेतली आहे. डिझाईन्स नसलेल्या कापडी पिशव्या हल्ली नवे रूप घेऊ लागल्या आहेत. रंगीबेरंगी, नवनवे प्रकार तयार होऊ लागल्याने हल्ली कापडी पिशवी वापरणे देखील फॅशन होऊ लागले आहे.

साड्या, ताग, डिझायनर कपडे, जीन्सपासून बनवलेल्या कापडी पिशव्यांना जास्त पसंती मिळू लागली आहे. मग भाजी खरेदी करायची असो, टिफिन बॉक्स किंवा मग शॉपिंग कापडी पिशव्या उत्तम पर्याय आहे, असे नागरिक मानतात.

घरीच पिशव्या बनवण्यास प्राधान्य
कापडी पिशव्यांचे अनेक कारखाने आहेत; पण काही महिला या घरीच स्वतःच्या हाताने तयार केलेल्या पिशव्या वापरण्यासाठी प्राधान्य देतात. कापडी पिशव्या वापरणे हा फक्त पर्याय राहिलेला नसून त्याचे स्वरूप बदलू लागले आहे. त्यामुळे त्याच्याकडे बघण्यात येणारा कंटाळवाणा दृष्टिकोन आता फॅशन होऊ लागला आहे.

महाग असूनही पसंती
प्लास्टिक पिशव्यांच्या तुलनेत कापडी पिशव्या महाग आहेत. दुकानदारांकडे वस्तू घेतल्यास पिशवी मोफत मिळत होती. तसेच प्लास्टिक एक रुपयांपासून दहा रुपयांपर्यंत मिळत होत्या. मात्र त्या तुलनेत कापडी पिशव्या महाग आहेत. एकदा खरेदी केलेली पिशवी दोन ते तीन वर्षांपर्यंत वापरता येते.

जुन्या काळात कापडी पिशव्या वापरण्याशिवाय पर्याय नव्हता. प्लास्टिक पिशव्या सहज आणि दुकानदारांकडून विनामूल्य मिळू लागल्याने वापर वाढला होता. मात्र आता नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण झाल्याने कापडी पिशव्या पुन्हा नव्या रूपात बाजारात दिसून लागल्या आहेत.
- मयुरी परब, महिला

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86878 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top