राजकीय वादळानंतर मुंबई पोलिस दक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय वादळानंतर मुंबई पोलिस दक्ष
राजकीय वादळानंतर मुंबई पोलिस दक्ष

राजकीय वादळानंतर मुंबई पोलिस दक्ष

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : राज्यातील परिस्थिती पाहता मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच दरम्यान मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी शनिवारी मुंबईतील सर्व अप्पर पोलिस आयुक्त व सर्व पोलिस उपायुक्तांची बैठक घेतली. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.

मुंबई शहरातील सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय, मंत्री, खासदार, आमदारांचे कार्यालय, निवासस्थान शाखा या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्याबाबत सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक राजकीय व्यक्तीसोबत समन्वय ठेवून आगाऊ माहिती घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. सध्या सुरू असलेले राजकीय कार्यक्रम, बैठका या ठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्याबाबत सांगण्यात आले. विशेष शाखेने सोशल मीडियावर लक्ष ठेवून संबंधितांना आवश्यक माहिती त्वरित देण्यास सांगितले आहे. कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही, हिंसा करणार नाही आणि तोडफोड करणार नाही याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टीने सर्वांनी सजग राहून कर्तव्य करणे अपेक्षित आहे. या सूचना आपल्या अधिपत्याखालील सर्व पोलिस अधिकारी व अंमलदारांना देण्याबाबत सांगण्यात आले. तसेच मुंबई शहरात कलम १४४ चे प्रतिबंधात्मक आदेश पाळले जातील याबाबत सूचना देण्यात आल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86923 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..