नरेश म्हस्के यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरेश म्हस्के यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा
नरेश म्हस्के यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

नरेश म्हस्के यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ शनिवारी ठाण्यात अनेक पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर त्यांच्या समर्थकांनी शनिवारी ठाण्यातील शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या वेळी उपस्थितांना संबोधताना श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. शिंदे यांनी केवळ ठाणे किंवा जिल्ह्यात नाही, तर महाराष्ट्रातही काम केले. त्यामुळेच त्यांना या आमदारांचा पाठिंबा लाभला असल्याचे सांगितले. तसेच शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच शिवसेनेतील आमदारांनी त्यांना सोबत दिली असल्याचे शनिवारी झालेल्या ठाण्यातील शक्तिप्रदर्शातून समोर आले आहे. या घटनेला काही तासांचा अवधी सरतो ना सरतो तोच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर नरेश म्हस्के यांनी थेट मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख यांच्याकडे आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. तसे पत्र त्यांनी पक्षप्रमुखांना दिले असून त्यात भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा... जात, गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना...! त्यामुळे शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच, पण गेली अडीच वर्षे आपल्या संघटनेची ‘राष्ट्रवादी’ गळचेपी चाललीय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86930 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..