अवैध गुटखा वाहतुकीचा पर्दाफाश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध गुटखा वाहतुकीचा पर्दाफाश
अवैध गुटखा वाहतुकीचा पर्दाफाश

अवैध गुटखा वाहतुकीचा पर्दाफाश

sakal_logo
By

मनोर, ता. २६ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चिल्हार फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध गुटाखा वाहतुकीचा पर्दाफाश केला आहे. बुधवारी रात्री करण्यात आलेल्‍या कारवाईत टेम्पोसह ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून टेम्पोचालकाला अटक करण्यात आली आहे.
गुजरातमधून महाराष्ट्रात बेकायदा गुटख्याची वाहतूक करण्यासाठी महामार्गावर अनेक गुटखा माफिया सक्रिय आहेत. चिल्हार फाटा भागात गुटखा वाहतूक करणारा टेम्पो येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केलेल्या टेम्पोत विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा आढळून आला. आरोपींविरुद्ध मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86941 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..