वाढवण बंदर रस्त्याची मोजणी जमावाने पाडली बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढवण बंदर रस्त्याची मोजणी जमावाने पाडली बंद
वाढवण बंदर रस्त्याची मोजणी जमावाने पाडली बंद

वाढवण बंदर रस्त्याची मोजणी जमावाने पाडली बंद

sakal_logo
By

डहाणू, ता. २६ (बातमीदार) ः वाढवण बंदर रस्त्याच्या कामाचे मोजमाप करण्यास आलेल्या आंतरराष्ट्रीय सल्लागार आणि तंत्रज्ञ कंपनीच्या सर्वेअर आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना गावातील लोकांनी पिटाळून लावले.
वरोर-वाढवण दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर वाकडी खांजणाजवळ कोणीतरी वाढवण बंदराच्या रस्त्याच्या कामाचे मोजमाप करीत असल्याचे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरले. तेथे शेकडो लोकांनी धाव घेतली. त्यावेळी वाढवण बंदराच्या रस्त्यासाठी इंटर कॉन्टिनेन्टल आणि टेक्नोक्रेटस प्रा.लि.आंतरराष्ट्रीय सल्लागार तंत्रज्ञ कंपनीचे सर्वेअर अर्जुनसिंग काविआ हे मोजमाप करीत असल्याचे आढळून आले. त्या सर्वेअर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना जमावाने पिटाळून लावले. त्याचप्रमाणे अशीच मोजणी ओसार गावाजवळील चाररस्ता येथे चालली असल्याचे ओसार गावातील तरुणांना कळताच तेथील मोजमापही बंद पाडले.
वाढवण बंदर उभारणीचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आणि डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाकडे प्रलंबित आहे. तसेच बंदर उभारणीस कोणतीही परवानगी मिळालेली नाही. असे असूनही वाढवण-वाणगाव चारोटीपर्यंतच्या रस्त्याचे बेकायदेशीर मोजमाप करणे, हे न्यायाची पायमल्ली करणारे आहे, ही बाब वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देईल, असे संघर्ष समितीतर्फे सांगण्यात आले. दरम्‍यान, ही मोजणी जेएनपीटीसाठी किंवा अन्य कोणासाठी करण्यात येत होती, हे कळू शकले नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86942 Txt Palghar Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..