महाराष्ट्र नगरात सापडला मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र नगरात सापडला मृतदेह
महाराष्ट्र नगरात सापडला मृतदेह

महाराष्ट्र नगरात सापडला मृतदेह

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २६ (बातमीदार) ः मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर येथे रविवारी (ता. २६) सकाळी इम्रान अन्सारी (वय २८) हा चिखलात रुतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याला तत्काळ उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेले, परंतु तिथे दाखल करण्यापूर्वीच मृत असल्याचे घोषित करण्यात आले. ट्रॉम्बे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.
महाराष्ट्रनगरच्या भीमनगर परिसरात वास्तव्यास असलेला इम्रान मागील दोन दिवसांपासून बेपत्ता होता. रविवारी सकाळी तो चिखलात रुतलेल्या अवस्थेत स्थानिकांना आढळला. त्या वेळी शनिवारी गावावरून आलेली त्याची पत्नी गुलआफशा शौचालयाकडे निघाली होती. तिने त्याला ओळखले. याविषयी पोलिसांच्या चेंबूर नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच त्यांनी ट्रॉम्बे पोलिसांना कळवले. ट्रॉम्बे पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले व त्यांनी इम्रानला राजावाडी रुग्णालयात नेले होते. इम्रानची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती, अशी माहिती गुलआफशा हिने पोलिसांना जबाबात दिली आहे. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येईल. त्याच्या मृत्यूविषयी कुटुंबीयांना कोणावरही संशय नाही, तसेच कोणाविरोधात तक्रार नसल्याचे ट्रॉम्बे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86951 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top