श्रीवर्धनमध्ये मुसळधार पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीवर्धनमध्ये मुसळधार पाऊस
श्रीवर्धनमध्ये मुसळधार पाऊस

श्रीवर्धनमध्ये मुसळधार पाऊस

sakal_logo
By

श्रीवर्धन, ता. २६ (बातमीदार)ः तालुक्यात शनिवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने रविवारी सकाळी अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. शिस्ते येथे पाणी साचल्‍याने रविवारी सकाळी दीड तास वाहने अडकून पडली होती.
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन भागात लावणीला तयार झालेली पिके पाण्याखाली गेली, तर शिस्ते व कापोली येथील मार्गावर काही ठिकाणी पाणी आले होते. पहिल्याच पावसात नाले तुंबण्याच्या घटना काही ठिकाणी घटल्‍याने पुढील तीन महिने परिस्‍थिती आणखी गंभीर होण्याची भीती परिसरातील नागरिकांना आहे.
शिस्ते येथे दरवर्षी पाणी साचत असले तरी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून योग्‍य उपाययोजना करण्यात येत नाहीत. परिणामी बोर्लीकडून वडवलीमार्गे मुंबईकडे किंवा दिघीकडे जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. वाहतूक खोळंबल्‍याने प्रवाशांना नाहक ताटकळत राहावे लागते. बोर्लीपंचतन येथील पुलालगत दोन्ही बाजूला भराव करण्यात आल्‍याने चिखलमय पाणी साचते.

रस्ते पाण्याखाली
बोर्लीपंचतन शहराच्या पोहा मिल नाका ते दत्त मंदिर याठिकाणी यंदा अनेक नाल्यांतून मोऱ्या बसविण्याचे काम उशिरा सुरू झाले. पावसामुळे काम अपूर्ण असून पाण्याचा निचरा होत नसल्याने येथील सखल भागात पाणी साचले आहे. शिस्ते-दिवेआगर मार्गावरील यशवंती खार ही परिसरातील चार ते पाच गावांतील अनेक शेतकऱ्यांची अंदाजे २०० हेक्टर क्षेत्रातील खारशेती जमीन पाण्याखाली गेली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86959 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..