‘त्या’ तिन्ही आमदारांना शिवसैनिक जागा दाखवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘त्या’ तिन्ही आमदारांना शिवसैनिक जागा दाखवणार
‘त्या’ तिन्ही आमदारांना शिवसैनिक जागा दाखवणार

‘त्या’ तिन्ही आमदारांना शिवसैनिक जागा दाखवणार

sakal_logo
By

पेण, ता. २६ (वार्ताहर) : शिवसेनाप्रमुखांनी ज्यांच्यावर विश्वास टाकला. त्यांनीच गद्दारी करून आपला वेगळा गट निर्माण केला. त्या गटात रायगड जिल्ह्यातील तीन आमदार सामील झाले आहेत. त्यांना येणाऱ्या काळात शिवसैनिक आपली जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असा सजग इशारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.
राज्यात काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये गटबाजी निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंड निर्माण झाले आहे. परिणामी, महाराष्ट्रातील राजकारणाने वेगळीच कलाटणी मारली आहे. राज्यात त्या निषेधार्थ मोर्चा आंदोलन होत असतानाच पेण तालुक्यातही शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात नगरपालिका चौकात घोषणाबाजी केली. रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. या भूमीत गद्दारी करून चालत नाही. त्यामुळे अशा गद्दारांना शिवसैनिक रायगडाच्या टकमक टोकावरून त्याचा कडेलोट करतील, असे जैन यांनी यावेळी सांगितले. या वेळी एका कार्यालयावर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर शिवसैनिकांनी दगडफेक अणि शाही फेक करून तो फाडण्यात आला. निषेध मोर्चात तालुकाप्रमुख तुषार मानकावळे, पंचायत समिती सदस्य नरेश गावंड, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, जिल्‍हा संघटिका दीपश्री पोटफोडे, पेण शहरप्रमुख संजय पाटील, तालुका संपर्कप्रमुख राजाराम पाटील, युवासेना अधिकारी चेतन मोकल, नंदू मोकल, गजानन मोकल, दर्शना जवके, राजश्री घरत, महानंदा तांडेल, अर्चना पाटील आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिस बंदोबस्तात गुन्हे दाखल
आंदोलनकर्त्या शिवसैनिकांपैकी जवळपास १२ ते १५ जणांवर पेण पोलिसांनी कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. या वेळी पेण शहरात पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86976 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..