
महामार्गावर रस्ताओलंडताना अल्फा हॉटेल जवळ पादचाऱ्या स चिरडले
कासा, ता. २६ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यातच शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास हॉटेल अल्फा व शेरेपंजाब हॉटेलसमोर मुंबई मार्गावर एक विचित्र अपघात घडला आहे. अल्फा हॉटेलसमोरील रस्ता ओलांडून जाताना भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. या धडकेमध्ये सदर इसम गंभीर जखमी झाला होता, त्यानंतर महामार्गावरच जखमी असल्यामुळे अनेक वाहनांनी धडक देऊन अक्षरशः चिरडला गेला. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, तसेच कासा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घटनास्थळी पोहोचले. महामार्गावरील वाहतूक ठप्प करून तेथील मृत्यू झालेल्या इसमाच्या शरीराचे अवशेष गोळा केले, पण त्याची ओळख पटत नव्हती. कारण त्याचे कपडे, मोबाईल सर्व चक्काचूर झाला होता. शेवटी मोबाईल बॅटरीच्या उजेडात प्रयत्न केल्यावर मोबाईलची चिप सापडली. अज्ञात इसम मृत व्यक्ती म्हणून रजिस्टरमध्ये लिहिले. बराच वेळ प्रयत्न केल्यावर ती चिप दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून काही कळतंय का पाहिले. तेव्हा सारणी लोकेशन दाखवत काही नंबर आले. त्यावर संपर्क साधत त्या इसमाच्या नातेवाईकांना पोलिस ठाण्यात बोलावून ओळख पटविली. तेव्हा सारणी येथील घाटाळ परिवारातील तो इसम निघाला. विलास चंद्रकांत घाटाळ (वय-४५, सारणी पाटील पाडा) असे त्यांचे नाव आहे. यासाठी कासा पोलिस ठाण्याचे प्रभारी श्रीकांत शिंदे, सहायक पोलिस अधिकारी संदीप पाटील, अंमलदार एम. गोजरे, ए. टी. पवार व पोलिस कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86978 Txt Palghar Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..