साईनगर शिर्डीसाठी १० विशेष गाड्यांना मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साईनगर शिर्डीसाठी १० विशेष गाड्यांना मुदतवाढ
साईनगर शिर्डीसाठी १० विशेष गाड्यांना मुदतवाढ

साईनगर शिर्डीसाठी १० विशेष गाड्यांना मुदतवाढ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने साईनगर शिर्डी आणि ढेहर का बालाजीदरम्यान धावणाऱ्या १० साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला आहे. त्यामध्ये प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेल्या आहे.

रेल्वे क्रमांक ०९७४० साप्ताहिक अतिजलद उन्हाळी विशेष साईनगर शिर्डी येथून ३ जुलै ते ३१ जुलैपर्यंत (५ फेऱ्या) दर रविवारी सकाळी ७.२५ वाजता सुटेल आणि ढेहर का बालाजी येथे दुसऱ्या दिवशी रात्री ८.१० वाजता पोहोचेल. रेल्वे क्रमांक ०९७३९ साप्ताहिक अतिजलद उन्हाळी विशेष ढेहर का बालाजी येथून १ जुलै ते २९ जुलैपर्यंत (५ फेऱ्या) दर शुक्रवारी रात्री ९.२० वाजता सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी रात्री ८.३० वाजता पोहोचेल. या दोन्ही गाड्यांच्या थांब्यात आणि संरचनेत कोणताही बदल झालेला नाही. तसेच विशेष ट्रेन क्रमांक ०९७४० साठी विशेष शुल्कासह बुकिंग आजपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झाले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86986 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top