खारघरमधील काही ढाबे जमीनदोस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरमधील काही ढाबे जमीनदोस्त
खारघरमधील काही ढाबे जमीनदोस्त

खारघरमधील काही ढाबे जमीनदोस्त

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ ः खारघर शहराच्या सौंदर्याला ग्रहण लावणाऱ्या बेकायदा धाब्यांवर अखेर पनवेल महापालिकेने कारवाई केली. सकाळने ‘खारघर होतेय ढाबेघर’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केल्यानंतर पनवेल महापालिकेने ही कारवाई केली. खारघर मधील टाटा कॅन्सर रस्त्याशेजारी असणारा ढाबा काढण्यात आला. तसेच ओवा गावाजवळील सेक्टर ३५ व ३६ मधील एका धाब्यावर कारवाई केली. परंतु अद्यापही काही ढाबे, गॅरेज आणि वाहनांचे सर्विस स्टेशन तसेच उभे असल्यामुळे नागरिकांकडून पालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हजारो कोटी रुपये खर्च करून सिडकोने तयार केलेले खारघर हे आंतरराष्ट्रीय नोड आता बेकायदा व्यवसायिकांच्या हातात सापडले आहे. या नोडमधील मोकळ्या व मोक्यावरच्या भूखंडांवर बेकायदा ढाबे, गॅरेज, सर्विस स्टेशन, सिमेंटवाले, रोपवाटिकांनी संसार थाटला आहे. सद्या सिडकोकडून पनवेल महापालिकेला भूखंड हस्तांतराची प्रक्रीया सुरु असल्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी खारघर नोडपासून फारकत घेतली आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या या नाकर्तेपणामुळे भूमाफिया आणि बेकायदा व्यवसायिकांचे चांगलेच फावले आहे. मिळेल त्या मोकळ्या जागेवर हवे तसे विस्तृत ढाबे आणि गॅरेज टाकले जात आहे. या सर्व बेकायदा बाबींची सकाळने भांडा फोड केल्यानंतर शुक्रवारी पनवेल महापालिकेच्या पथकाने कारवाईचा दिखावा केला. एक,दोन ढाब्यांवर कारवाई केल्याचे भासवून उर्वरित ढाबे चालकांना अभय देऊन हे पथक माघारी परतले. कारवाई केलेल्या ढाबे चालकांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे सुद्धा पनवेल महापालिकेने दाखल केलेले नाहीत. काहींनी आधीच कारवाईच्या सूचना देऊन जागेवर बांबूच्या साहायाने उभे केलेल्या ढाबे काढून टाकण्यास वेळ दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजले आहे. महापालिका आणि सिडकोच्या या दुर्लक्षपणामुळे खारघरमधील मोक्याचे भूखंड गिळंकृत होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
-------------------------------
फेरीवाले मोकाट
खारघर शहरात सिडकोच्या ढिसाळ नियोजनामुळे बेकायदा फेरीवाले मोकाट झाले आहे. खारघर सेक्टर १२, सेक्टर २०, सेक्टर ३६, ओवा गाव आदी भागात मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी संसार थाटला आहे. या भागात सिडकोच्या भूखंडांवर मोठा बेकायदा मासळी व मटण मार्केट उभारला आहे. या मार्केटवर कारवाई करण्याऐवजी महापालिका व सिडकोचे अधिकारी दिमतीला असतात. कारवाईच्या नावाखाली तोकडी कारवाई करून भूखंडाला कुंपण घातले जात नाही. या फेरिवाल्यांमुळे पदपथावर नागरीकांना आणि रस्त्यावर वाहन चालकांच्या अधिकारांवर गदा येत आहे. हप्तेखोर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86993 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top