नरेश म्हस्के यांची शिवसेनेतून हकालपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरेश म्हस्के यांची शिवसेनेतून हकालपट्टी
नरेश म्हस्के यांची शिवसेनेतून हकालपट्टी

नरेश म्हस्के यांची शिवसेनेतून हकालपट्टी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ ः शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही मिनिटांतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. सध्या सुरू असलेल्या घडामोडींमध्ये हकालपट्टीची ही पहिली कारवाई असून ती ठाण्यातूनच झाली आहे. त्यामुळे ठाण्यातील शिंदे गटाला हा सर्वात मोठा झटका मानला जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर नरेश म्हस्के यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. शनिवारी ठाण्यात झालेल्या शक्तिप्रदर्शनातही ते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबतच दिसले. त्यानंतर काही तासांतच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, काही मिनिटांतच त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे पत्रक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आले. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने म्हस्के यांची ही हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्यासह युवासेना विस्तारक राहुल लोंढे यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टीच्या कारवाईनंतर म्हस्के यांनी ‘वरातीमागून घोडे’ असे ट्विट केले. ‘राजीनामा दिल्यानंतर आली यांना जाग, आधीच निघून गेलेल्याला म्हणतायत चल भाग’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g86998 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..