शांताराम मोरे यांच्याविरोधात घोषणाबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शांताराम मोरे यांच्याविरोधात घोषणाबाजी
शांताराम मोरे यांच्याविरोधात घोषणाबाजी

शांताराम मोरे यांच्याविरोधात घोषणाबाजी

sakal_logo
By

भिवंडी, ता. २६ (बातमीदार) ः भिवंडी ग्रामीणचे शिवसेना आमदार शांताराम मोरे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यामुळे भिवंडी तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली. रविवारी (ता.२६) शिवसैनिकांनी शांताराम मोरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. माझा त्यांच्यासोबत असलेला संबंध तुटला असल्याची भूमिका जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी या वेळी जाहीर केली.

भिवंडी शहरातील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात सेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे व भिवंडी तालुकाप्रमुख विश्वास थळे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भिवंडीतील तालुका पदाधिकारी, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांनी एकनाथ शिंदे, शांताराम मोरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्याप्रमाणे शिवसैनिक आपली पुढील रणनीती ठरवतील, असे सांगत सर्व शिवसैनिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन प्रकाश पाटील, देवानंद थळे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87016 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top