३० हजार सुरक्षारक्षकांचे वेतन वाढ रखडली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३० हजार सुरक्षारक्षकांचे वेतन वाढ रखडली!
३० हजार सुरक्षारक्षकांचे वेतन वाढ रखडली!

३० हजार सुरक्षारक्षकांचे वेतन वाढ रखडली!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.२७ ः एकीकडे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना नियमितपणे वेतनवाढ दिली जाते. मात्र दुसरीकडे त्याच शासकीय कार्यालयात सुरक्षा देणाऱ्या मुंबईतील ३० हजारांपेक्षा जास्त सुरक्षा रक्षकांना वेतनवाढ मागील चार वर्षांपासून झाली नाही. फक्त वेतनवाढीचे कामगार मंत्र्यांकडून आश्वासन दिले जाते. मात्र आश्वासनाची पूर्तता होत नाही. येत्या काही दिवसांत वेतनवाढ झाली नाही तर आम्हा सुरक्षा रक्षकांसह सरकारविरोधात रस्त्यावर उतरावे लागले, असा इशारा सुरक्षा रक्षक वाहन चालक व जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष अभिलाष डावरे यांनी सरकारला दिला आहे.
वेतनवाढ कराराला चार वर्षे उलटूनसुद्धा सुरक्षा रक्षक जवानांची वेतनवाढ झालेली नाही. १७ मे २०२२ रोजी मंत्रालयात कामगार मंत्र्यांच्या दालनात सुरक्षा रक्षकांच्या रखडलेल्या मागण्यांबाबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरक्षा रक्षक संघटना प्रतिनिधींना एक महिन्यात वेतनवाढ करू, असे आश्वासन दिले होते. एक महिना उलटूनसुद्धा सुरक्षा रक्षकांची वेतनवाढ झाली नाहीत.
सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांबाबतचा अहवाल कामगार आयुक्त कार्यालयात प्रलंबित आहे. हा अहवाल पंधरा दिवसांत द्यावा, अशा सूचना कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगार आयुक्तांना दिल्या आहेत. संपूर्ण शासकीय विभागाची वेतनवाढ वेळेत झाली आहे, मग सुरक्षा रक्षकांवर अन्याय का, असा प्रश्न सुरक्षा रक्षकांमध्ये उपस्थित होत आहे. लवकरात लवकर वेतनवाढ मिळाली नाही तर येत्या काही दिवसांत सुरक्षा रक्षक व त्यांचे कुटुंबीय सरकारविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा माय बळीराजा सुरक्षा रक्षक वाहनचालक व जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष अभिलाष डावरे दिला आहे.
...
जवानांनी घर कसे चालवायचे?
कोविड काळात आपल्या जिवाची पर्वा न करता आणि कसली अपेक्षा न बाळगता सुरक्षा रक्षक जवानांनी त्यांचे कर्तव्य बजावले आहे. या काळात अनेकांचे प्राणही गेले आहेत. आम्ही गेल्या चार वर्षांपासून हक्काची वेतन वाढीची मागणी करतोय. मात्र यावर सरकारकडून आश्वासनाशिवाय दुसरे काही मिळत नाही. महागाईच्या काळात सुरक्षा रक्षकांना १८ हजार रुपये वेतन आहे. या वेतनामध्ये सुरक्षारक्षक जवानांनी नेमके घर कसे चालवायचे, मुलांचे शिक्षण, आजारपण, प्रवास भाडे कसे भागवावे, असा प्रश्न अभिलाष डावरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना उपस्थित केला आहे.
....

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87023 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..