
अदाणीच्या रक्तदान शिबिरात १४,००० कर्मचाऱ्यांचा सहभाग
मुंबई, ता. २७ ः अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त समूहाच्या १४ हजार कर्मचाऱ्यांनी देशभरातील विविध ठिकाणी रक्तदान केले.
अदाणी फाऊंडेशन दरवर्षी अध्यक्षांच्या वाढदिवशी रक्तदान मोहिमेचे आयोजन करते. यंदा मागील वर्षापेक्षा पाच हजार बाटल्या अधिक रक्त जमा झाले. भारतातील २० राज्यांमधील ११५ शहरांमध्ये १५२ ठिकाणी रक्तदान केंद्रांची व्यवस्था १३८ रक्तपेढ्यांमार्फत करण्यात आली होती. यानिमित्ताने अदाणी कुटुंबाने विविध सामाजिक कामांसाठी ६० हजार कोटी रुपयांच्या देणगीची घोषणा केल्यानंतर एका दिवसातच ही राष्ट्रव्यापी रक्तदान मोहीम राबवण्यात आल्याचे अदाणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांनी सांगितले. अदाणी फाऊंडेशनचे १८ राज्यांमधील २,४१० गावे आणि शहरांमध्ये काम सुरू असून त्याद्वारे ३७ लाख जनतेचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87033 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..