शहाड येथील नाल्यांची केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहाड येथील नाल्यांची केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून पाहणी
शहाड येथील नाल्यांची केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून पाहणी

शहाड येथील नाल्यांची केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून पाहणी

sakal_logo
By

कल्याण, ता. २७ (बातमीदार) : कल्याण पश्चिममधील शहाड येथील नव अंबिकानगर सोसायटी, खेमजी चाळ, अवनी सोसायटी, शुभम मार्बल या परिसरात दरवर्षी पावसाळ्यात नाले तुंबून मोठ्या प्रमाणात सोसायटी परिसरात व घरात पाणी शिरते. याची माहिती मिळाल्यानंतर कपिल पाटील यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेत सदर ठिकाणचा पाहणी दौरा केला व नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या.

उल्हासनगर परिसरातून सांडपाणी मोठ्या प्रमाणात प्रवाहित होते, पावसाळ्यात पाणी वाढल्यानंतर हेच नाल्याचे पाणी ड्रेनेजमार्फत थेट सोसायटी व घरांमध्ये घुसते. यावर तातडीने कार्यवाही करून पावसाळ्यात अशा घटना घडू नयेत, याची काळजी घ्या, अशी सक्त ताकीद केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिली. यावेळी रेल्वे, उल्हासनगर महापालिका व कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी या दौऱ्यात उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87050 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..