कसाऱ्यात जिजाऊ संघटनेतर्फे गुणवंतांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कसाऱ्यात जिजाऊ संघटनेतर्फे गुणवंतांचा सत्कार
कसाऱ्यात जिजाऊ संघटनेतर्फे गुणवंतांचा सत्कार

कसाऱ्यात जिजाऊ संघटनेतर्फे गुणवंतांचा सत्कार

sakal_logo
By

खर्डी, ता. २७ (बातमीदार) : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या कसारा विभागाच्या वतीने परिसरातील दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दर्शना अहिरे, राणी अग्रवाल, रवींद्र सदगीर, शुभम लोटे, विद्या बांगर, बागेश्वर अग्रवाल, प्रगती बागुल, राणी सारुकते, साहिल भोळे यांच्यासाहित ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक परेश कारंडे, रोहित उबाळे व जिजाऊ संस्थेचे ठाणे जिल्हाप्रमुख मोनिकाताई पानवे यांनी ‘भविष्यातील करिअरच्या संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कसारा परिसरातील शेठ बा. ह. अग्रवाल विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, न्यू वंडरलँड हायस्कूल कसारा शाळांतील प्रथम तीन क्रमांकाच्‍या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिजाऊ संघटनेचे कसारा अध्यक्ष महेंद्र शिंदे, विनायक सावंत, शंकर भगत, कमल अग्रवाल, शरद वेखंडे, सुभाष करवर व किशोर धसाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87067 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top