अग्निपथविरोधात कॉंग्रेस आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अग्निपथविरोधात कॉंग्रेस आक्रमक
अग्निपथविरोधात कॉंग्रेस आक्रमक

अग्निपथविरोधात कॉंग्रेस आक्रमक

sakal_logo
By

भांडुप/ वडाळा/ मालाड, ता. २७ (बातमीदार) ः मुंबईत शिवसेनेतील बंडखोरीमुळे राजकारण तापले असताना काँग्रेसने यापासून वेगळे राहणे पसंत केले आहे. अशातच जनतेचे लक्ष वेधत काँग्रेसने केंद्राने घोषित केलेल्‍या अग्निपथ योजनेच्‍या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत विविध ठिकाणी आंदोलन केले.

भांडुपमध्‍ये सत्याग्रह आंदोलन
भांडुप ः भांडुप पश्चिम स्टेशन रोड परिसरात या निर्णयाविरुद्ध ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने यापूर्वी आंदोलन करण्यात आले होते. ही योजना विद्यार्थ्यांच्या हिताची नसल्याने याचा निषेध करण्यासाठी मोर्चाही काढण्यात आला. पुन्हा एकदा ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेसच्या वतीने भांडुप परिसरात भाट्टीपाडा येथे अग्निपथ योजनेच्या विरोधात शांतता पूर्ण आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत पोस्टरच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला. सुरेश कोपरकर, तात्या थोरात, बिपीन विचारे, आशा कोपरकर, प्रीतम तुळसकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मालाडमध्ये १० ठिकाणी धरणे
मालाड ः मालाड काँग्रेसच्या वतीने मालाडमधील नऊ वॉर्डात धरणे प्रदर्शन केले गेले. मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मालाड पश्चिमेतील मढ मार्केट, मार्वे टी जंक्शन, मालवणी अग्निशमन केंद्राजवळ, मालवणी गेट क्रमांक सात येथे तसेच मालवणी क्रमांक आठ बेस्ट आगाराजवळ आणि मालाड लिंक रोड एव्हरशाईन नगर सिग्नलजवळ आणि मालाड रेल्वे स्थानक हनुमान मंदिरजवळ काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मंत्री अस्लम शेख, महासचिव डॉ. नेकसन नाटके, सचिव संतोष चिकणे, ॲड. विक्रम कपूर, पंकज कपूर आदी पदाधिकारी व स्थानिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अँटॉप हिलमध्ये काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन
वडाळा ः अग्निपथ योजनेविरोधात आंदोलनाचे पडसाद राज्यभर पडताना दिसत आहेत. या योजनेचा निषेध करण्यासाठी सायन कोळीवाडा काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी काँग्रेसचे माजी आमदार जगन्नाथ शेट्टी यांच्या कार्यालयाजवळ एमजीआर चौक एसएम रोड अँटॉप हिल येथे निषेध व्यक्त करीत सायन कोळीवाडा काँग्रेस कमिटी महासचिव अमित शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87077 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..