एसी बस मधून कमी दरात प्रवास कल्याण डोंबिवली करांना मिळणार कधी ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसी बस मधून कमी दरात प्रवास कल्याण डोंबिवली करांना मिळणार कधी ?
एसी बस मधून कमी दरात प्रवास कल्याण डोंबिवली करांना मिळणार कधी ?

एसी बस मधून कमी दरात प्रवास कल्याण डोंबिवली करांना मिळणार कधी ?

sakal_logo
By

कल्याण, ता. २७ (बातमीदार) : नवी मुंबईच्या एनएमएमटीच्या बसेस तिकीट दराच्या धर्तीवर केडीएमटीच्या बससेवेमधील तिकीटदरात सुसूत्रता आणण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. केडीएमटीमधील नॉनएसी बसेसमधून सरासरी अंदाजित चार टक्के आणि एसी लोकलमधून ४५ टक्केने तिकीट दर कमी होणार असल्याने, कल्याण-डोंबिवलीकरांना एसी बसमधून स्वस्त दरात प्रवास करता येणार आहे; मात्र या प्रस्तावावर अजून सरकारदरबारी निर्णय न झाल्याने स्‍वस्‍तात प्रवास कधी सुरू होणार, असा सवाल उपस्‍थित होत आहे.
केडीएमटी आर्थिक संकटात असून ताफ्‍यात १४० हून अधिक बस असल्या तरी प्रत्यक्षात नॉन एसी ५२ आणि एसी ७ बसेस रस्त्यावर काढण्यात केडीएमटीला यश येत आहे. सरकारने मंजुरी दिल्याने ७ जुलै २०१६ पासून सुधारित तिकीट भाडेवाढीची अंमलबजावणी केली होती. तद्‍नंतर वाढती महागाई पाहता केडीएमटी प्रशासनाने १५ डिसेंबर २०१८ रोजी भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारला सादर केला होता. या वेळी बेस्टने मुंबईमधील तिकीट भाडेवाढ कमी केल्याने केडीएमटीच्या तिकीट भाडेवाढीला स्थगिती देण्यात आली. याच कालावधीत पुन्हा नव्याने ४ मार्च २०२२ रोजी केडीएमटी प्रशासनाने नवी मुंबईच्या एनएमएमटीच्या बसेसच्या तिकीट भाडेदरांच्या धर्तीवर प्रस्ताव बनवला असून तो सरकारला सादर केला होता; मात्र एमएमआरटीच्या बैठकीत प्रस्तावावर चर्चा आणि अंतिम निर्णय न झाल्याने कल्याण-डोंबिवलीकरांचा स्वप्नभंग झाला आहे.

केडीएमटी स्वस्तात प्रवास...
केडीएमटीच्‍या पहिल्या टप्‍प्यात दोन किलोमीटर नॉनएसी बसेसने प्रवास केल्यास सुमारे पाच रुपये प्रतिप्रवासी तिकीट भाडे द्यावे लागणार असून, ४५ किलोमीटरवर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला प्रतिप्रवासी ५५ रुपये मोजावे लागत आहेत. यात टप्पेनिहाय बदल करत चार टक्के प्रवास भाडे कमी केल्याने पहिल्या आणि शेवटच्या थांब्यावर तिकीट कमी नसले तरी मधल्या थांब्यांवर कमी होणार आहे.
----
सरासरी अंदाजित ४५ टक्के भाडे कमी होणार
सध्या एसी बसमधून पहिल्या टप्‍प्यात दोन किलोमीटरवर एका प्रवाशाला १५ रुपये मोजावे लागत असून, नवीन तिकीट पाच रुपयांनी कमी होणार आहे. प्रतिप्रवासी १० रुपये तिकीट होणार असून ४५ किलोमीटरवर एसी बसमधून सध्या प्रतिप्रवासी १३५ रुपये मोजावे लागत असून, आता नवीन भाडे ६५ रुपयांनी कमी म्हणजे सरासरी अंदाजित ७० रुपये प्रतिप्रवाशाला मोजावे लागणार आहे. या निर्णयाला शासन मंजुरी कधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
----
कोट
तिकीट भाड्याबाबत प्रस्ताव सरकारला पाठवला असून, त्यांच्या अंतिम मंजुरीची वाट पाहत आहोत. याला मंजुरी मिळताच अंमलबजावणी केली जाईल. डॉ. दीपक सावंत, केडीएमटी व्यवस्थापक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87080 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top