
पामबीच मार्गावर बर्निंग कार
नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : वाशी येथून पामबीचमार्गे उलवे येथे जाणाऱ्या मारुती एसएक्स कारने पेट घेतल्याने पूर्णपणे खाक झाल्याची घटना रविवारी रात्री मोराज सर्कल येथे घडली. कारचालकाने वेळीच बाहेर पळ काढल्याने थोडक्यात बचावला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली, मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळाली होती.
उलवे येथे राहणारा व्यावसायिक इम्रान सय्यद (३६) हा रविवारी सायंकाळी कामानिमित्त वाशीमध्ये आला होता. रात्री आठच्या सुमारास आपल्या मारुती कारने पामबीचमार्गे उलवे येथे जात होता. या वेळी मोराज सर्कल येथे सिग्नलवर थांबल्यानंतर इम्रानच्या कारमधून धूर येत असल्याचे बाजूच्या कारचालकाने सांगितले. इम्रान बाहेर पडताच कारने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस व अग्निशमनच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या
घटनेची नोंद सानपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
काही काळ वाहतूक कोंडी
भर चौकात घडलेल्या या दुर्घटनेमुळे पामबीच मार्गावर शेकडो वाहने अडकून पडल्याने व त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या वेळी पामबीच मार्गावरून जाणारे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87086 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..