डंपरच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डंपरच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठार
डंपरच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठार

डंपरच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठार

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : वाशीतून मानखुर्दला जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव डम्परने धडक दिल्याने त्‍याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे सायन-पनवेल मार्गावर वाशी टोल नाक्याजवळ घडली. अपघातानंतर वाशी पोलिसांनी डम्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.
तरुणाचे नाव किशोर बाळकृष्ण काटकर (२९) असून तो मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरमध्ये राहत होता. रविवारी सायंकाळी किशोर कामानिमित्त नवी मुंबईत आला होता. त्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास दुचाकीने मानखुर्द येथे जात होता. वाशी टोल नाक्याजवळ मागून भरधाव डम्परने त्याला धडक दिली. किशोरचे दोन्ही पाय डम्परच्या पुढील चाकाखाली आल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत किशोरला वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्‍यावर त्‍याला जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87088 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top