अ‍ॅलोपेशियाचा स्त्रियांच्या मानसिक स्थितीवर परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अ‍ॅलोपेशियाचा स्त्रियांच्या मानसिक स्थितीवर परिणाम
अ‍ॅलोपेशियाचा स्त्रियांच्या मानसिक स्थितीवर परिणाम

अ‍ॅलोपेशियाचा स्त्रियांच्या मानसिक स्थितीवर परिणाम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : केस गळणे, विरळ होणे किंवा टक्कल पडणे या समस्या प्रत्येकाच्या मानसिक आणि सामाजिक जीवनावर गंभीर परिणाम करतात. पण या समस्या बहुतेकदा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येत असल्याचा गैरसमज दिसून येतो. वास्तविक तसे नसून स्त्रियांनादेखील केस गळतीच्या समस्यांमा सामोरे जावे लागते आणि त्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
लोकांमध्ये केस गळण्याचे परिणाम आणखी समजून घेण्यासाठी ‘द एस्थेटिक क्लिनिक्स’मधील त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर आणि कॉस्मेटिक सर्जन, सह-संस्थापक डॉ. देबराज शोम यांनी यावर मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरू या वेगवेगळ्या शहरात भेट देणाऱ्या रुग्णांवर प्रश्नावलीच्या आधारावर अभ्यास केला. भारतातील प्रौढांमधील जीवनाच्या गुणवत्तेवर अ‍ॅलोपेशिया (केस गळणे) च्या प्रभावाविषयी करण्यात आलेल्या निरीक्षणांची नोंद आंतरराष्ट्रीय डर्माटोलॉजिकल अहवालांमध्येही करण्यात आली आहे.
१८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे ८०० रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ४४२ पुरुष आणि ३५८ महिला होत्या. यातून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे, असे लक्षात आले की १८ ते ३० वर्षे वयोगटातील ३० टक्के पुरुषांना केस गळतीची समस्या आहे आणि सुमारे २७ टक्के महिलांनी देखील केस गळतीची समस्या नोंदवली, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक जीवनावर परिणाम झाला, त्यांना नैराश्य आले, घराबाहेर पडण्यास संकोच वाटू लागला आणि समाजीकरण टाळले. त्यापैकी बऱ्याच जणांना अ‍ॅलोपेशियामुळे समाजात मिसळण्यास लाज वाटणे, नैराश्य येणे, आत्मविश्वास ढासळणे या समस्या उद्भवल्या.
.........................................
द एस्थेटिक क्लिनिक्सचे सह-संस्थापक व कॉस्मेटिक सर्जन डॉ. देबराज शोम यांनी सांगितले की, केस गळणे ही समस्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करते. तणाव, चिंता, नैराश्य, आत्मविश्वास कमी होणे, आत्मविश्वास ढासळणे, आत्महत्येचे विचार येणे आदी परिणाम दिसून येतात. शारीरिक, रासायनिक, हार्मोनल बदल, स्वयंप्रतिकार आणि दाहक रोग, जन्मजात रोग, संसर्ग आणि निओप्लाझम यासारख्या अनेक कारणांमुळे अंदाजे ५०टक्के पुरुष आणि स्त्रिया त्यांचे वय कितीही असो अलोपेशियाने प्रभावित होतात.
...
टक्कल पडणे किंवा केस विरळ होणे हे स्त्रियांसाठी अधिक क्लेशकारक असू शकते. एक वेळेस टक्कल पडलेला पुरुष सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह असू शकतो, परंतु टक्कल पडलेली स्त्री ही समाजाकडून स्वीकारली जात नाही.
- डॉ. रिंकी कपूर, त्वचाविकार तज्ज्ञ

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87091 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..