शिंदे गटाबाबत राज ठाकरेच निर्णय घेतली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे गटाबाबत राज ठाकरेच निर्णय घेतली
शिंदे गटाबाबत राज ठाकरेच निर्णय घेतली

शिंदे गटाबाबत राज ठाकरेच निर्णय घेतली

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २७ ः शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी संपर्क केल्यानंतर पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे; परंतु यावरून जवळीक होऊ शकते, मात्र यासंबंधित सर्वस्वी निर्णय राज ठाकरे यांचाच असेल, असे सूचक विधान मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी केले आहे. मनसे-भाजप युतीच्या चर्चेनंतर आता मनसे व शिंदे गट युती होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना कोणाची, याची चर्चा सुरू झाल्यानंतर आता शिंदे आपला गट एखाद्या राजकीय पक्षात विलीन होईल का याची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. त्यात त्यांनी नुकतीच राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी संपर्क केला होता. याचवेळी राजकीय चर्चा झाल्याचेही बोलले जात आहे. यावर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. राजू पाटील या वेळी म्हणाले, गेल्या दोन दिवसांपासून मी राज ठाकरे यांच्याशी संपर्क केलेला नाही. प्रसार माध्यमांमार्फतच मला राज ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी संपर्क केल्याचे समजले. तसेच सध्या जे राजकारण सुरू आहे हे पाहता शिवसेना आणि महाविकास आघाडीचा हा अंतर्गत वाद आहे. मात्र शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वेगळा गट केला आहे. जो मुद्दा आमच्यासोबत मेळ खातो. त्या अनुषंगाने जवळीक होऊ शकते; परंतु याचा सर्वस्वी निर्णय हा राज ठाकरे यांचा असून त्यावर मी अधिक भाष्य करू इच्छित नाही, असेही पाटील या वेळी म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87098 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top