गद्दारांना जवळ करू नका! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गद्दारांना जवळ करू नका!
गद्दारांना जवळ करू नका!

गद्दारांना जवळ करू नका!

sakal_logo
By

शहापूर, ता. २७ (बातमीदार) ः एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शहरापुरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून सोमवारी पार पडलेल्या तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिंदे गटाचा निषेध करण्यात आला. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात घोषणाबाजी करत पक्ष फोडण्याचे पाप करणाऱ्या गद्दारांना जवळ करू नका, अशी भावना शिवसैनिकांनी या बैठकीत व्यक्त केली.

शिंदे गटाने पक्षाविरोधात केलेल्या बंडाळीचा निषेध करण्यासाठी शहापुरात आज शिवसैनिकांची बैठक बोलावण्यात आली होती. तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या बैठकीला मोठी गर्दी केली होती. या बैठकीत शिवसैनिकांनी आपण सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्या आजाराचा फायदा घेऊन शिवसेना फोडण्याचे पाप करणाऱ्या गद्दारांना धडा शिकवा, त्यांना जवळ करू नका, अशा संतप्त भावना या वेळी व्यक्त करण्यात आल्या. नियती कोणालाही सोडत नाही, शिवसेनेचे नाव घेऊन निवडणूक लढवणाऱ्यांनी स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढवून दाखवावी, असा इशाराही या वेळी देण्यात आला. या बैठकीस उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, तालुकाप्रमुख मारुती धिर्डे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, चंद्रकांत जाधव, रघुनाथ कदम, महिला आघाडीच्या रश्मी निमसे, नगराध्यक्षा गायत्री भांगरे, तसेच तालुक्यातील उपतालुका प्रमुख, शाखाप्रमुख, नगरसेवक, नगरसेविका यांसह तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, आसनगाव शिवसेना शहर शाखेत लावण्यात आलेली एकनाथ शिंदे यांची तसबीर उतरवून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87111 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..